लढा पावन खिंडीतला - भाग १
प्रस्तावना :
"आजपर्यंत आपण ज्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि चित्रपटांमधून पावनखिंडीचा इतिहास पाहिला व ऐकला, ती केवळ एक रोमांचक भावनिक कहाणी ठरली आहे. परंतु, त्यापलीकडे जाऊन भूगोलाची दुर्गमता, हवामानाचे संकट, वेळेचे गणित आणि सामरिक (Tactical) मुद्द्यांचा सखोल विचार केल्याशिवाय या युद्धाची खरी महती लक्षात येत नाही. सुरवातीपासूनच या ऐतिहासिक लढ्याकडे केवळ करमणूक किंवा दंतकथा म्हणून न बघता, एका ‘मिलिट्री मिशन’च्या अभ्यासाची मानसिकता ठेवून वाचन केल्यास, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अचूक निर्णयक्षमतेचा खरा आवाका समजतो. एका मिलिट्री कमांडरच्या शिस्तीत, व्यामिश्र परिस्थतीत आणि अचूक गणनेत केलेली ही मांडणी नव्या पिढीला युद्धशास्त्राचा आणि मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा एक नवा आणि अभ्यासपूर्ण पाठ देणारी ठरेल.
लढा पावनखिंडीतला — भाग १
सध्याच्या भूसेना, वायुसेना व नौसेना तज्ज्ञ लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ऐतिहासिक मांडणी
सादरकर्ते: विंग कमांडर शशिकांत ओक
प्रास्ताविक: मिलिट्री कमांडरांच्या विचाराने मांडलेला इतिहास
शिवाजी महाराजांच्या सैन्याला मिरजेचा वेढा अयशस्वी ठरल्यामुळे आणि सिद्दी जोहर स्वारी करायला येत असल्यामुळे, विस्तीर्ण आणि जिंकायला अवघड अशा सर्वात जवळच्या पन्हाळगडाची निवड केली गेली. तेथून कोकणात उतरून गरजेनुसार हालचाली करायच्या असावा असा अंदाज बांधता येतो
या मोहिमेत सहभागी सैन्याचे मूळ स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. बहारामनी राज्याचे ५ शकले झाल्यानंतर विजापूर दरबारातील सरदारांमध्ये एकसंधपणा नव्हता
भोरच्या हिरडस मावळची भातशेती करणारे, चिखलात आणि पावसात तासंतास उभे राहण्याचा काटकपणा जबाडला असणारे बांदल सैनिक आणि त्यांचे सरदार बाजीप्रभू देशपांडे यांची निवड याच सामरिक निकषावर केली गेली
अध्याय १: लढ्यातील दुर्लक्षिलेले — वाटाडे!
पन्हाळ्यामधून सुटका करून घेण्याच्या मोहिमेत सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती वाटाड्यांची
प्रवासातील अडथळे: रात्र, मुसळधार पाऊस, ओढे-नाळे भरून वाहणे, घसरड्या वाटा आणि वाटेत जीव घेणाऱ्या रक्तपिपासू जळवांचा तडाखा यांमुळे सैन्याचा वेग मंदावला
. संपर्क संकेत: अंधारात कमीत कमी आवाज करत, हातातील काठीचा आधार घेत, आणि शिट्ट्यांच्या संकेतावरून सैन्यात मेळ बसवला जात असे
. युद्धसाहित्य व बुट्टीडोल्या: बुरुडांनी बनवलेल्या बळकट आणि हलक्या बुट्ट्यांमध्ये तोडफोड हत्यारे, दोर-शिड्या, कासरे, दांडपट्ट्यांचे जोड आणि खाण्याचे सामान सोबत घेतले होते. गरज पडल्यास या बुट्ट्या उलट्या करून नद्या पार करण्यासाठी तरंगायलाही वापरल्या गेल्या
.
अध्याय २: समरूप शिवाजींची बतावणी व सिद्दीची भम्रनिरास
शिवा काशीद यांचे बलिदान: पन्हाळगडावरून मोक्याच्या वेळी तोतया शिवाजी (शिवा काशीद) हे मसाई पठारावरून अंबाघाटाच्या मार्गाने वेगळ्या दिशेने बाहेर पडले
. सिद्दी जोहरचा भ्रम: पावसाच्या रात्री पकडलेला 'सिवा' हा खरा नसून तोतया आहे हे लक्षात आल्यावर सिद्दी जोहरच्या पायाखालची जमीन सरकली
. या बतावणीमुळे महाराजांना पुढे निघण्यासाठी मोलाचा वेळ मिळाला. पराभूत मानसिकता: ऐनवेळी हुकूक चुकलेल्या सिद्दीच्या सैन्याची अवस्था खेळ संपलेल्या खेळाडूंसारखी पराभूत झाली होती. तरीही संशयामुळे सिद्दी मसूदने आपले घोडदळ कोकणच्या मार्गावर पाठवले
.
अध्याय ३: महाराजांची वाट व वाटाड्यांचे मतभेद
पन्हाळगडावरून पुसाटी बुरुजाच्या राजदिंडीतून बाहेर पडून महाराजांचा जथ्था सोनुर्ले, बुरंबळ मार्गे पुढे निघाल
वाटाड्यांमधील मतभेद: काही वाटाड्यांच्या मते बुरंबळवरून मांजरेजवळ कासारी नदीप्रवाहाला पकडता येईल, तर काहींच्या मते लांबच्या मार्गाने गेले तरी नदीचे पात्र नक्की गाठता येईल असा वाद होता
. प्रत्यक्ष युद्धपरिस्थितीत मार्ग चुकून महाराजांचा जथ्था पांढरेपाणी जवळ पोहोचला
. "अडचणीतून संधी शोधतो तो सिकंदर ठरतो" या न्यायाने या अनपेक्षित वाटेमुळेच लढ्याचे चित्र पूर्णपणे बदलले आणि गणिमीकाव्याला नवी दिशा मिळाली.
अध्याय ४: पावनखिंडीतील व्यूहरचना — रणसंग्राम
बाजीप्रभूंचा मास्टरस्ट्रोक: कासारी नदीच्या उगमापाशी आल्यावर महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना अल्प सैनəशी खिंडीत थांबण्याचे आदेश दिले आणि स्वतः विशाळगडाकडे मार्गस्थ झाले
. घळीतील व्यूह: २ किमी लांबीच्या आणि १७५ मीटर (५६० फूट) उतरणीच्या त्या अवघड घळीत बांदल मावळ्यांनी लपून शत्रूवर मारा केला
. दांडपट्टा पथकाचा अचूक वापर: चिंचोळ्या जागेत दांडपट्टा फिरवणे अशक्य असते, हे लक्षात घेऊन बाजीप्रभूंनी दांडपट्टेधारी वीरांना खिंडीच्या बाहेर मोकळ्या मैदानी भागात उभे केले
. घळीतून खाली उतरणाऱ्या हबशी व पठाण सैनिकांना बाजींच्या शिलेदारांनी जागीच टिपले आणि कापून काढले .
0 Reviews:
Post Your Review